Wednesday, March 10, 2010

नभ विरघळताना

नभ विरघळताना,
ढगांचं पाणी होताना
एक उत्कटता असते
माझ्या 'मी' त्वातून
तुला साकारण्याची
माझ्या नसण्यातूनच
तुझ्या असण्याची।

पानांनी थेंब झेलताना
पावसात चिंब भिजताना
एकच ईच्छा असते
उंच ऊंच मथ्यावरुन
झेप घेण्याची
तुझ्या आंतररंगात
खोलवर रुजण्याची।

काट्यातून् वाट काढ्ताना
काटा खोलवर रुतताना
सर्वांगातून वेदना भिनताना
एकच धडपड असते
तुझ स्वरूप् उलगडण्याची
माझी अस्वस्थता दूर् करण्याची।

अनंत कालचक्रात जन्म-मृत्यूचा
'क्षणिक' उत्सव असतो तरिही
न जाणो का कदाचित
एक आनंदच असतो
राञी पलिकडे पाहण्यात
मनात जपलेलं
सृष्टीत उतरवण्यात।

नितीन.